Nilesh Rane said the managers of Gharda Chemical Company should be arrested
महाराष्ट्र

घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक व्हायला हवी – निलेश राणे

रत्नागिरीतील लोटे MIDC तील घरडा केमिकल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला होता आणि त्यानंतर तेथे आग लागली होती. यामध्ये ३ कामगार मृत्युमुखी पडले. या संदर्भात माजी खासदार निलेश राणे यांनी घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांच्या अटकेची मागणी केली आहे. व्यवस्थापकांनी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. या केमिकल कंपनीत कामगारांकडे केमिकल प्रोटेक्शन […]

Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

मोठी बातमी : ताजमहाल थोड्याच वेळात होणार पर्यटकांसाठी खुला, फेक कॉल करणाऱ्याला अटक

ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या. पोलिसांनी संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. शोध मोहिमेनंतर संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्याचं सुरक्षा यंत्रणेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात फिरोजाबादच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यानेच याबद्दल फेक कॉल केला होता. एका अज्ञात फोन कॉलवरून ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवण्यात आल्याची सूचना आज सकाळी सुरक्षा यंत्रणांना […]

NCB has detained Sushant Singh Rajput's assistant director Rishikesh Pawar
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला अटक, NCB ने घेतले ताब्यात

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी समन्स बजावल्यापासून ऋषिकेश पवार फरार झाला होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा […]

A 15-year-old girl was raped by 17 people for five months
देश

भयंकर : १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार

कर्नाटकमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलीच्या मावशीचा देखील समावेश आहे. जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी ३० जानेवारीला पोलीस ठाण्यात १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात […]

Serial killer arrested, 18 women killed after wife ran away with another man
देश

सिरियल किलरला अटक, पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याच्या रागातून १८ महिलांची हत्या

हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी महिलांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला अटक केली आहे.या ४५ वर्षीय आरोपीने १८ महिलांची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. अटक केल्यानंतर नुकत्याच दोन महिलांच्या झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे. वृत्तानुसार, याआधी त्याला २१ प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्ह्यांचा समावेश आहे. एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा […]

TRP scam: Former BARC executive Partha Dasgupta
महाराष्ट्र मुंबई

टीआरपी घोटाळा : BARC चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काऊंसिल (BARC) चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे. आज, शुक्रवारी त्यांना स्थानिक कोर्टात आणलं जाईल. BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च […]

Former MLA Harshvardhan Jadhav arrested in Pune
पुणे महाराष्ट्र

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि एका महिलेविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या दोघांविरुद्ध अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळी त्यांच्या आई, […]

Amul scam: Former Gujarat Home Minister Vipul Chaudhary arrested
देश

अमूल घोटाळा : गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक

गुजरातचा अमूल घोटाळा या दिवसात चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात पोलिसांनी काल दूध सागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक केली. आर्थिक अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदार भगवान भाई चौधरी यांनी मेहसाना पोलिस स्टेशनमध्ये विपुल चौधरी यांच्याविरुद्ध केला होता. गांधीनगर सीआयडी गुन्हेगारी शाखेच्या म्हणण्यानुसार दुध सागर डेअरीचे […]