गुजरातचा अमूल घोटाळा या दिवसात चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात पोलिसांनी काल दूध सागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक केली. आर्थिक अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदार भगवान भाई चौधरी यांनी मेहसाना पोलिस स्टेशनमध्ये विपुल चौधरी यांच्याविरुद्ध केला होता.
गांधीनगर सीआयडी गुन्हेगारी शाखेच्या म्हणण्यानुसार दुध सागर डेअरीचे माजी अध्यक्ष विपुल चौधरी, वर्तमान अध्यक्ष आशा ठाकोर, उपाध्यक्ष मोघजी ठाकोर, व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह 3० अधिका्यांनी दुग्धशाळेतील 1932 कर्मचाऱ्यांना अतिरिक्त बोनस म्हणून सुमारे 15 कोटी रुपये देऊन अर्ध्याहून अधिक रक्कम विपुल चौधरी यांच्या खात्यात जमा केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण :
मेहसाणा सहकारी दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष असताना विपुल चौधरी यांनी सन 2013 मध्ये सुमारे 22 कोटी रुपयांचा पोषण आहार महाराष्ट्रात पाठविला होता . २०१4 मध्ये सहकारी निबंधकांकडे तक्रार केली गेली, त्यानंतर कुलसचिवांनी जानेवारी २०१5 मध्ये विपुल चौधरी यांना नोटीस बजावली. यावर, जुलै 2018 मध्ये सहकारी न्यायाधिकरणाने चौधरी यांना ऑक्टोबर 2018 पर्यंत 9 कोटी 10 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात, विपुल चौधरी यांचं म्हणणं आहे कि, दुष्काळात महाराष्ट्रात विनामूल्य पोषण पाठविणे हा भ्रष्टाचार नाही. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 11. 25 कोटी रुपये जमा केले असून यासाठी त्यांना त्यांची जमीनदेखील तारण म्हणून ठेवावी लागली आहे.