मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काऊंसिल (BARC) चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे. आज, शुक्रवारी त्यांना स्थानिक कोर्टात आणलं जाईल.
BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था आहे. या संस्थेनेच सुचवल्यावरुन मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरु केला होता.