पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली चतुर्श्रृंगी पोलिसांनी अनिल वसंत गायकवाड या २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंग्रजी विभागातून रसायनशास्त्र विभागाकडे जाणाऱ्या तीन विद्यार्थिनी चालत असताना ही घटना घडली. गायकवाड यांनी त्यांच्याकडे पाहत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेला या घटनेची माहिती दिली. […]
टॅग: अटक
पुणे : १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पिठगिरणी कामगाराला अटक
पुणे : एका पीठ गिरणी कामगाराने शाळेत निघालेल्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोली येथे ही घटना घडली असून वाघोली पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. २५ मार्च रोजी झालेल्या या गुन्ह्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वाघोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, […]
पुणे : हडपसरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक
पुणे : अमली पदार्थांसाठी प्रिस्क्रिप्शन ड्रग्जचा वापर वाढत आहे. बेकायदेशीर औषधांच्या किमती जास्त असल्याने अनेक तरुण या पदार्थांकडे वळत आहेत, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. एका कारवाईत हडपसर पोलिसांनी नशा निर्माण करणारी औषधे विकल्याबद्दल दोन तरुणांना अटक केली. पोलिसांच्या अहवालानुसार, आरोपी व्यक्तींकडे औषध निर्मितीची पदवी नव्हती किंवा त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा (FDA) आवश्यक […]
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक
पुणे : स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे त्याच्या गुणाट या गावी आला होता. महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. मात्र […]
धक्कादायक! महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अखेर अटक, 25 महिलांना त्रास देत असल्याचे निष्पन्न
मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती […]
पुणे : अवैधरित्या सावकारी करणाऱ्याला अटक, पोलिसांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन
पुणे : पुणे शहरातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत. पोलिसांकडे तक्रार आली होती की गोर-गरीबांना अवैधरित्या मासिक 10 टक्के व्याज दराने कर्ज देऊन त्यांच्याकडून सुरक्षा ठेव स्वरुपात कर्जदाराच्या सहीचे कोरे चेक्स, कोरे स्टॅम्प पेपर व इतर महत्वाची कागदपत्रे घेवून कर्जदाराकडुन मुद्दल व्याजासहीत वसूल […]
ब्रेकिंग! अनिल देशमुख यांना CBI ने केली अटक
मुंबई : सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान, CBI कोठडी टाळण्यासाठी अनिल देशमुख रुग्णालयात दाखल झाले, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला होता. कथित १०० कोटींच्या वसुली प्रकरणासंदर्भात देशमुख यांच्या कोठडीची मागणी करणाऱ्या सीबीआयच्या अर्जाला विशेष सीबीआय […]
देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांकडून अटक, अनेक भाजप नेत्यांना घेतले ताब्यात
मुंबई : राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर पक्षाच्या नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढल्याबद्दल फडणवीस यांच्यासह मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, नितीश राणे, मंगल प्रभात लोढा आणि निरंजन डावकरे यांनाही अटक केली. मला […]
आर्यन सुमारे 4 वर्षांपासून करतोय ड्रग्सचा वापर, चौकशीदरम्यान सतत रडतोय आर्यन खान
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या क्रूजमधील ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. आर्यन खान, त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अन्य आरोपी मुनमुन धमेचा यांना एनसीबीने पकडले होते. रविवारी संध्याकाळी न्यायालयाने या तीन आरोपींना एका दिवसाच्या एनसीबीच्या कोठडीत पाठविले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सतत चौकशी सुरु आहे. ड्रग प्रकरणात अनेक मोठ्या गोष्टी बाहेर […]
मुंबईत आणखी एका दहशतवाद्याला ATS कडून अटक
मुंबई : महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मागील महिन्याभरात यासंबंधातली मुंबईतील ही तिसरी अटक आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर आणि रिझवान या दहशतवाद्यांनंतर […]