मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून देखील त्यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट […]
टॅग: सचिन वाझे
सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी तेव्हाच सांगितले होते – संजय राऊत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, सचिन वाझे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते, हे मी तेव्हाच सांगितले होते. सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा निर्णय घेतानाच काही शिवसेना नेत्यांना मी हा इशारा दिला होता, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते […]
NIA च्या टीमने केले मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या घटनेचे नाट्यरूपांतरण
अँटिलीया प्रकरणात मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास आता एटीएस कडून NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम रात्री उशीरा रेतीबंदर खाडीत त्या ठिकाणी गेली जिथे 5 मार्चला मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. मनसुख यांची हत्या रात्री झाली होती, त्यामुळे NIA पथक सचिन वाझे यांच्यासमवेत रात्री तेथे पोहोचले आणि त्यांनी गुन्हा घडला त्या दिवशीच्या संपूर्ण घटनेचे […]
अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये धमकीचं पत्र सचिन वाझेंनीच ठेवलं, चौकशीत वाझेंची कबुली
मुंबई : मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. ते धमकीचं पत्र आपणच ठेवल्याचं निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत कबुल केलं आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात […]
राज्यात ‘या’ प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही – राज ठाकरे
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपाकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]
गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुल करण्यास सांगितलं – परमबीर सिंग
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्वाचे मुद्दे : मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी […]
अँटिलीया स्फोटक प्रकरणी घटनेचे नाट्यरुपांतर, सचिन वाझे यांना मोठा कुर्ता घालून चालायला लावलं
मुंबई : अँटिलीया स्फोटक प्रकरणी NIA सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर या घटनेचे नाट्यरुपांतर देखील करण्यात आले आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे नाट्यरुपांतर सुरु होते. स्फोटकं ठेवल्यानंतर पीपीई किट सदृष्य मोठ्या आकाराचा कुर्ता घालून एक व्यक्ती स्कॉर्पिओतून मागील […]
मोठा खुलासा : अँटिलियाबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच..
अँटिलियाबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं NIA नं स्पष्ट केलं आहे. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या, या प्रकरणी एनआयए तपास करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अँटिलियाबाहेर एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE […]
राज्यात राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना – राष्ट्रवादीत चर्चा की वाद?
सचिन वाझे यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर महाविकास आघाडीमध्येही ठिणगी पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विरोधकांनी विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं वाझे यांची बदली […]
मोठी बातमी : सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ, पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित
मुंबई : सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA नं शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात NIA कडे भक्कम पुरावे असल्याची चर्चा आहे. आता वाझेंचं पुन्हा एकदा पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. पहिल्यांदा […]