राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या 12 […]
टॅग: राजस्थान
भयंकर! कानात झाला इयरफोनचा स्फोट, तरुणाचा मृत्यू
राजस्थान : राजस्थानच्या जयपूरमध्ये केबल इयरफोनचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. हा तरुण कॉम्प्युटरला इयरफोन लावून गाणी ऐकत होता. अचानक मोठ्या आवाजासह इयरफोन फुटला आणि तरुणाच्या कानातून रक्त वाहू लागले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या सीकर महामार्गावरील उदयपूरिया गावात राहणाऱ्या 28 वर्षीय राकेश नागर या तरुणाचे […]
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 30 किलो वजनाच्या साखळ्यांनी बांधले, आणि…
राजस्थान : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मागील 3 महिन्यांपासून 30 किलो वजनाच्या साखळीने बांधून ठेवले होते. याबद्दल माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना लोखंडी साखळ्यांनी बांधलेली ही महिला आढळली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिलेला लोखंडी साखळीतून मुक्त केले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
वडिलांनी केली सात वर्षाच्या मुलाची हत्या, अगोदर पाण्याच्या टाकीत फेकलं, दगड मारले आणि…
राजस्थान : राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात एका विक्षिप्त वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या निरागस मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी मुलारामने आपल्या मुलाला उचलून पाण्याच्या टाकीत फेकले, त्यानंतर दगड मारून त्याला जखमी केले. या मुलाने टाकीबाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वडिलांनी टाकीचे झाकण बंद करून टाकले. त्यामुळे या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या […]
‘त्या’ तरुणांना पळता भुई थोडी… रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी दिला चोप
राजस्थान : राजस्थानमधील अलवर येथील हमीरपूर गावात काही मुलींनी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चोप दिल्याची घटना घडली आहे. रोज-रोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून या मुलींनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना अलवर जिल्ह्यातील हरसौरा पोलिस स्टेशन परिसरातील हमीरपूर गावातील आहे. काही तरुणांच्या दररोजच्या छेडछाडीमुळे त्रस्त झालेल्या मुलींनी या तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे. या मुलींनी […]
ज्याला मृत समजून अंत्यसंस्कार केले, ‘तो’ नऊ दिवसांनी जिवंत परतला, मात्र भूत समजून…
उदयपूर : राजस्थानमध्ये राजसमंद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. ज्या व्यक्तीला मृत समजून कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कार केले, ती व्यक्ती नऊ दिवसांनी जिवंत परतली. आता पोलिस प्रशासन निरुत्तर आहे की ज्याचे अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती? बेवारस मिळालेल्या त्या मृतदेहाचं ना शवविच्छेदन केलं होतं, ना त्याचा व्हिसेरा ठेवला होता. ही घटना राजसमंद जिल्हा येथील […]
कोरोनाला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन हा एकच पर्याय, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी..
भोपाळ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर होत चालली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देशव्यापी लॉकडाउनची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात ऑक्सिजन, औषधं आणि इतर साहित्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हटले कि, आता देशव्यापी लॉकडाउन हा एकच पर्याय उरला आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ – […]
महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार
जागतिक महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थान येथील अजमेरमध्ये गुजरातच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी तरुणीला JLN रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक […]
संतापजनक : औषध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
राजस्थानमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. धौलपूरमधील राजाखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चार तरुणांनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी ही अल्पवयीन मुलगी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने औषध आणण्यासाठी परिसरातील दुकानात गेली होती. तेथे दुकान मालक आणि अन्य तिघे जण […]
माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला भीषण अपघात, अझरुद्दीन थोडक्यात बचावले
जयपूर : माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानातील सवाई माधोपूर येथे अपघात झाला. या अपघातात मोहम्मद अझरुद्दीन यांची गाडी पलटली. लालसोट कोटा मेगा हायवेवरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ हा अपघात झाला. मोहम्मद अझरुद्दीन या अपघातातून थोडक्यात बचावले. माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या धावत्या कारचा टायर निखळल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यात […]










