राजस्थान : एका भरधाव कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जयपूरच्या परकोटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. घटनेच्या वेळी चालक दारुच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात संताप […]
टॅग: राजस्थान
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत झाले सहभागी
राजस्थान : राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा बुधवारी 10 वा दिवस आहे. सवाईमाधोपूर येथील भदोती येथून बुधवारी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. आरबीआयचे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन यांनीही बुधवारी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधींची यात्रा आज दौसा जिल्ह्यात दाखल होणार आहे. सवाई माधोपूर येथील भदोती येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. […]
राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथील जत्रेत चेंगराचेंगरी, 3 महिला भाविकांचा मृत्यू
राजस्थान : राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथील जत्रेत सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३ महिला भाविकांचा मृत्यू झाला. पहाटे ५ वाजता मंदिराचे प्रवेशद्वार उघडताच गर्दी अनियंत्रित झाली आणि लोकांनी धक्काबुक्की सुरू केली. या घटनेत तीन महिला भक्तांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सध्या […]
सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी गूड न्यूज, सामन्यापूर्वी नेमकं घडलं तरी काय…
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्ससाठी आज सर्वात महत्वाचा सामना सुरु होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राजस्थानच्या संघासाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण यापूर्वीच्या सामन्यात राजस्थआनला गुजरातकडून पराभवाचा धक्का बसला होता. पण पराभवानंतरही त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे सर्वात महत्वाचे […]
IPL 2022 डबल हेडर : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात 3.30 वाजता मॅच, राजस्थान आणि लखनौ यांच्यात 7.30 वाजता मॅच
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक ठरला असून, त्यांनी पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. […]
‘आई व्हायचं आहे, नवऱ्याला पॅरोल द्या’, पत्नीच्या याचिकेवर न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल
राजस्थान : उच्च न्यायालयाने राजस्थानमधील महिलेच्या याचिकेवर सुनावणी करत तिच्या पतीला पॅरोल मंजूर केला. महिलेने असा युक्तिवाद केला होता की तिला आई व्हायचे आहे आणि तिचा नवरा तुरुंगात आहे. अशा परिस्थितीत आई होण्याचा तिचा हक्क लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने महिलेच्या पतीला पॅरोल मंजूर केला. भिलवाडा जिल्ह्यातील एक व्यक्ती फेब्रुवारी 2019 पासून अजमेर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा […]
आई मुलीला शिकवत होती ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’, मग 9 वर्षीय मुलीने केला धक्कादायक खुलासा…
राजस्थान : राजस्थानमधील जोधपूरमध्ये चार वर्षांपूर्वी एका निष्पाप चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा आई तिच्या मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ म्हणजे काय हे समजावून सांगत होती तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आईच्या स्पष्टीकरणानंतर मुलीने असा काहीसा प्रकार सांगितला जो ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने सांगितले की, चार वर्षांपूर्वी शाळेत तिच्यासोबत […]
धक्कादायक! गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने मुलाला पंख्याला उलटं टांगून केली मारहाण
राजस्थान : राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निर्दयी बापाने आपल्या ८ वर्षांच्या मुलाला छताच्या पंख्याला मुलाला उलटं टांगून बेदम मारहाण केली. या मुलाने शाळेतून दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने मुलाला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. बुंदी जिल्ह्यातील डाबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरोली […]
मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याची केली तक्रार, पण मुलीवर पोलीस स्टेशनमध्येच झाला बलात्कार
राजस्थान : राजस्थानच्या सीकरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलीने हेड कॉन्स्टेबलवर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीचे म्हणणे आहे की हेड कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्याबाहेर पाठवले आणि तिच्यावर बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सीकर येथील एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर, मुलीच्या कुटुंबीयांनी सीकरमधील सिंगरावट […]
जीप आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 6 जणांची प्रकृती गंभीर
राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या 12 […]