मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, लज्जास्पद महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. केंद्र […]
टॅग: महाविकास आघाडी सरकार
मी वाटच पाहतोय की महाविकास आघाडी सरकार कधी पडतेय, झोपेतून उठलो की…
पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे. ते म्हटले कि, कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी […]
मराठा आरक्षण : विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच ठाकरे सरकारने मराठा आरक्षणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS (economic weaker Sections) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असून याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला […]
माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ‘ही’ धक्कादायक गोष्ट, मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ- संजय राऊत
मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत […]
Maharashtra Budget 2021 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थसंकल्पातील तरतुदी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आज (८ मार्च) विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. अर्थसंकल्पातील तरतुदी : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवांसाठी […]
गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त, सदाभाऊ खोत यांनी केलं कौतुक
सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे, असं म्हणत माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकरांचं कौतुक केलं आहे. गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार. हिंदकेसरी पै. […]
उर्मिला मातोंडकर आणि शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर माझ्या शुभेच्छा – प्रितम मुंडे
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान उर्मिला मातोंडकरच्या शिवेसना प्रवेशावरुन भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी टोला लगावला आहे. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. “माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाकडून त्यांनी नशीब आजमावून पाहिलं. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचं आणि […]
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे – नितीन गडकरी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नितीन गडकरी यावेळी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात […]
मुख्यमंत्र्यांची भाषा नाक्यावर होणाऱ्या भांडणांसारखी, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र […]
चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असतात – अजित पवार
सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ […]