अश्विनी गिते, पुणे : राजकीय, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील अपार योगदानाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांना “सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील भावे नाट्यमंदिरात आयोजित एक सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा […]
टॅग: बाळासाहेब थोरात
महाविकास आघाडी मध्ये बिघाडी? मुर्मूंना पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही, शिवसेनेची भूमिका अनाकलनीय – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीत आहे पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असं मतही […]
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण
अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून गुरुवारी रात्री ही माहिती दिली. सध्या राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असतानाच अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी […]
नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने, मराठा आरक्षणाबाबत संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुढे काय करावं लागेल, याबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं कि, “संभाजीराजे […]
राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका – बाळासाहेब थोरात
अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती. बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते […]
महसूलमंत्री थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, यंत्रणा कमी पडतेय म्हणत नमूद केल्या अनेक त्रुटी…
अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी ठिकठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी निरीक्षणे पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना कळविली आहेत. स्वत:च्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. यात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे, आपण नगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा […]
नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई : नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नाना पटोले यांनी कालच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसने पत्रक काढून नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल […]
मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना – बाळासाहेब थोरात
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलमडली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे, असे महसूलमंत्री […]
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण आम्हाला मान्य नाही – बाळासाहेब थोरात
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, “औरंगाबादचं नाव बदलण्याचा अजेंडा काँग्रेलसा मान्य नाहीये. महाविकास आघाडी सरकारची स्थापना विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे. यामध्ये हा अजेंडा नाही. त्यामुळे आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. शहराची नावं बदलण्याचा विषय आम्हाला मान्य नाही” ते […]
राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले – बाळासाहेब थोरात
शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले, असं मत त्यांनी व्यक्त केलं. “राहुल गांधी […]