औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “औरंगाबादचं नाव बदलण्याचा अजेंडा काँग्रेलसा मान्य नाहीये. महाविकास आघाडी सरकारची स्थापना विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे. यामध्ये हा अजेंडा नाही. त्यामुळे आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. शहराची नावं बदलण्याचा विषय आम्हाला मान्य नाही”
ते पुढे म्हणाले कि, “नाव बदलण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. नाव बदल करून काही होऊ शकत नाही. विकास कसा करता येईल हे महत्त्वाचं असतं. शिवाय असा प्रस्ताव शिवसेना आणणार नसल्याची मला खात्री आहे.”