लातूर : लातूर-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या चार दिवसांपूर्वी माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या वाहनाचा अपघात याच मार्गावर झाला होता. आज पहाटे पुन्हा एकदा या मार्गावर भीषण अपघात झाला असून, दोन ट्रॅव्हल्समध्ये पाठीमागून झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा […]
टॅग: पोलीस
ट्रॅक्टर मजुरांसह ६० फूट खोल विहिरीत कोसळला, सात महिला शेतमजूरांचा मृत्यू
हिंगोली : शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. टॅक्टर साठ फूट खोल विहिरीत कोसळला असून विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. या घटनेत सात महिला शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी […]
नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये सापडला मृतदेह, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
मुंबई : नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का […]
उस्मानाबाद येथील ‘त्या’ पीडित महिलेच्या पतीचीही आत्महत्या
उस्मानाबाद : काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली होती. आता त्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं, आणि नंतर औसा तालुक्यातील टाका या गावात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. […]
पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळली, रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल
पुणे : पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा सुरु आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितलं होतं. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा झाल्यामुळे भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे. […]
गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात तिघांना पोलिसांकडून अटक..
पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे. पोलीसांनी […]
अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
मुंबई : द डर्टी पिक्चर या चित्रपटातली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्याच अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. आर्याचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आर्याच्या मृत्यूच्या कर्णाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मोलकरणीने तिला फोन केला होता. परंतु आर्याने […]
हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे. यासाठी १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतले जाणार आहे. यासंदर्भात विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना […]
अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर केला बलात्काराचा आरोप
मुंबई : टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले. लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून […]
धक्कादायक : औरंगाबाद मध्ये चिमुकलीसह कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे हत्याकांड पहाटे पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात घडले आहे. अज्ञात हल्लेखोराने संभाजी निवारे यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, ८ वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा […]