अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी […]
टॅग: अर्णब गोस्वामी
तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे, इतके ध्यानात राहू द्या, शिवसेना नेत्याचा अर्णब गोस्वामी यांना इशारा
मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी गोस्वामी यांची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकप्रकारे अर्णब यांना इशारा दिला आहे. अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सु्प्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर अर्णब यांनी तळोजा कारागृहाबाहेर जमलेल्या गर्दीपुढे वंदे मातरम, […]
अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांसमवेत असलेल्या फोटोविषयी शरद पवार यांनी केला खुलासा
रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. आता यावर स्वत: शरद पवार यांनी खुलासा केला आहे. त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद […]
अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या सूचना
रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली […]
अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक एफआयआर दाखल
रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक नवी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३, ५०४, ५०६, […]
देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया
रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भाजप नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. अनेकांनी असंही म्हटलं आहे की, ही एक प्रकारची आणीबाणीच आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्यांना याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली चाकणकर यांनी […]
पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा आरोप; पोलिसांचे स्पष्टीकरण, खरं काय?
मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्यावर आज सकाळी पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. अटक करतेवेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. अर्णब गोस्वामी यांचे आरोप : अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज […]
तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? – कंगना रानौत
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. कंगनाने […]
ब्रेकिंग : अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल; अर्णब गोस्वामी यांना अटक
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल झाले आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे आहे. अर्णब गोस्वामी आणि पोलीस यांच्यात भांडण झाल्याचे रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसते आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही […]