रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भाजप नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. अनेकांनी असंही म्हटलं आहे की, ही एक प्रकारची आणीबाणीच आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्यांना याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला संशयित आरोपी अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र) विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो’
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला संशयित आरोपी अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र)विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो’ (1/2)#MumbaiPolice
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 4, 2020