मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने अत्यंत उत्तम खेळाचं प्रदर्शन करत आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडने गेल्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. पण, यावेळी भारतीय संघ ही हरणार नाही, इंग्लंडला जिंकायचे असेल तर त्यांना काहीतरी विलक्षण कामगिरी करावी लागेल, असे माजी इंग्लंड क्रिकेटर पॉल कॉलिंगवूडने म्हटलं.
पॉल कॉलिंगवूड म्हणाले कि, यावेळी भारतीय संघात उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. विशेषत: जसप्रीत बुमराह, सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे तो खतरनाक आहे. तो फिट आहे आणि त्याच्या पूर्ण क्षमतेने वेगवान गोलंदाजी करत आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाचीचं कोणत्याही संघाकडे उत्तर नाही. १२० चेंडूंच्या सामन्यात, जर तुमच्याकडे बुमराहसारखा गोलंदाज असेल जो २४ चेंडू टाकतो, त्याने सामन्यात खूप फरक पडतो असं कॉलिंगवूड म्हणाला.
भारतीय संघ अमेरिकेच्या कठीण खेळपट्टीवरही मोठ्या आत्मविश्वासाने खेळताना दिसला त्यांच्याकडे रोहित शर्मासारखा फलंदाज आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली. त्यावरुन दिसून आले की तो आता फॉर्ममध्ये परतला आहे. खरं सांगायचं तर मला वाटत नाही की यावेळी भारतीय संघ हरेल. भारताला हरवण्यासाठी इंग्लंडला असाधारण खेळ दाखवावा लागेल अंसही तो म्हणाला.