dhoni irfan pathan cricket
क्रीडा

धोनीला निवृत्तीचा सामना खेळायचा असेल तर… इरफानने केले ट्विट

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर धोनीच्या करोडो चाहत्यांनी धोनीला निवृत्तीचा सामना द्यायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

निवृत्तीचा सामना जर द्यायचा असेल, तर एक संपूर्ण संघच तयार असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सांगितले आहे. इरफानने यावेळी ११ खेळाडूंच्या संघाचे एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे बरेच दिग्गज क्रिकेटचपटू निवृत्त झाले. पण भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वगळता अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला निवृत्तीचा सामना खेळता आला नाही. राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, झहीर खान या दिग्गजांना आपली निवृत्ती मैदानात घेता आली नव्हती. त्यामुळे ज्या खेळाडूंना निवृत्तीचा सामना खेळता आला नाही, त्यांच्यासाठी एक सामना खेळवावा अशी मागणी इरफानने यावेळी केली आहे.

इरफानने ज्या खेळाडूंना गेल्या काही वर्षात निवृत्तीचा सामना खेळायला मिळाला नाही, त्यांचा एक संघच बनवला आहे. या संघात ११ खेळाडू असून त्यांनी आतापर्यंत क्रिकेटची बरीच वर्षे सेवा केली आहे, त्यामुळे त्यांना निवृत्तीचा सामना खेळायला मिळावा, असे इरफानला वाटत आहे. त्यामुळे त्याने ११ खेळाडूंचा संघ तयार केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत