Womens T20 Challenge Final : महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लॅझर्स संघानं स्पर्धेत बाजी मारली. पहिले बॅटिंग करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने कर्णधार स्मृती मंधानाच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावून 118 रन केले.
ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधाना आणि डेंड्रा डॉटिन यांनी 71 धावांची सलामी करून दिली. पूनम यादवनं डॉटिनला ( 20) माघारी पाठवून ट्रेलब्लॅझर्सला पहिला धक्का दिला. पण, मानधाना दुसऱ्या बाजूनं दमदार फटकेबाजी करताना दिसली. तिनं 49 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचून 68 धावा केल्या. 14.5 षटकात ट्रेलब्लॅझर्सला 101 धावांवर दुसरा धक्का बसला. ट्रेलब्लॅझर्सला 8 बाद 118 धावांवर समाधान मानावे लागले.
What a night! What a moment for the #Trailblazers
CHAMPIONS of #JioWomensT20Challenge 2020 pic.twitter.com/WIysjqPPGT
— IndianPremierLeague (@IPL) November 9, 2020
हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरचा संघ हे लक्ष्य सहज पार करेल असेच वाटत होते. पण, ट्रेलब्लॅझर्सच्या गोलंदाजांनी लयबद्ध गोलंदाजी करताना सुपरनोव्हाच्या धावांवर लगाम लावला. कर्णधार हरमनप्रीत वगळता अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्यानं सुपरनोव्हाला जेतेपद कायम राखण्यात अपयश आलं. ट्रेलब्लॅझर्सच्या नट्टकन चंथम हीनं सुरेख क्षेत्ररक्षण करताना संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. हरमनप्रीतला दुखापत झाल्याचा फटकाही सुपरनोव्हाला बसला. सुपरनोव्हाला 7 बाद 102 धावाच करता आल्या.