नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारचा भाग होण्याचे मान्य केले आहे.
अमित शाह म्हणाले कि, “भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022




