selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुणे : कॅम्प परिसरातून ड्रग डिलरला अटक, 1.37 लाख रुपये किमतीचे ड्रग जप्त

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 1.37 लाख रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे. मोहम्मद इब्राहिम तोहीद सय्यद (२३, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रयत्नशील आहे. 15 ऑगस्ट चौकाजवळील एमजी रोड येथे एक व्यक्ती मेफेड्रोनची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी ‘डिकॉय कस्टमर’ सय्यद यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यानंतर एसीपी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाने परिसरात सापळा रचून सय्यदला पकडले.

28 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे स्टाफसह पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना एम जी रोड, कॅम्प, पुणे येथील 15 ऑगस्ट चौकाकडुन पुलगेट चौकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवरील थिम्स फर्निशिंग अँड डेकोरशॉप या दुकानाच्या समोर सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती संशयितरित्या एम डी हा अंमली पदार्थ जवळ बाळगुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील स्टाफच्या मदतीने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

कारवाई दरम्यान आरोपीच्या ताब्यातील एकुण कि 2,03,100 चा ऐवज जप्त केला. त्यामध्ये 1,37,100 रुपयांची 09 ग्रॅम 140
मिलीग्रॅम एम डी पावडर, एक 6,000 रुपयांचा मोबाईल फोन, ६०००० रुपयांची हिरो करिझ्मा गाडी यांचा समावेश आहे. पुढील तपास लष्कर पोलीस ठाणे करत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत