नवी दिल्ली : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करुन देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर मी स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलं. या घोषणेला २ तासही पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच एक नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळात असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे निर्देश भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिले आहेत.
आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. त्यासोबतच त्यांनी मोठं मन दाखवत ते व्यक्तिगत रित्या मंत्रिमंडळात नसतील आणि बाहेरुन पाठिंबा देतील असं जाहीर केलं. भाजपचा पूर्ण पाठिंबा एकनाथ शिंदेंना असेल. हे आमच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्याचं चरित्र दर्शवते. आम्ही कुठल्याही पदाच्या लालसेसाठी नाही, आम्ही विचारांसोबत आहोत.
भाजपा ने महाराष्ट्र की जनता की भलाई के लिए बड़े मन का परिचय देते हुए एकनाथ शिंदे जी का समर्थन करने का निर्णय किया। श्री देवेन्द्र फडणवीस जी ने भी बड़े मन दिखाते हुए मंत्रिमंडल में शामिल होने का निर्णय किया है, जो महाराष्ट्र की जनता के प्रति उनके लगाव को दर्शाता है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 30, 2022
LIVE | Oath ceremony at Raj Bhavan, Mumbai #Maharashtra https://t.co/9hufVo6lMq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2022




