माजी सपा नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले.
अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून वेगळे झाल्यानंतर ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारी होते. त्याआधी त्यांची जवळीक भाजपासोबत वाढली होती. १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.
प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही करण्यात आले होते. आज(शनिवार) त्यांची प्राणज्योत मालवली.




