Emergency use of Bharat Biotech's Covaxin also approved

WHO कडून अद्याप कोवॅक्सिन लसीला मान्यता नाहीच, मागवला आणखी डेटा

ग्लोबल देश

जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (TAG) ने कोवॅक्सिन लसीला पुन्हा एकदा झटका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक सल्लागार गटाने (TAG) भारत बायोटेक कंपनीकडून आपत्कालीन वापरासाठी मंजूर यादीत (EUL) कोवॅक्सिन लसीचा समावेश करण्याबाबत विचार करण्यासाठी अधिक डेटा मागवला आहे. विशेष म्हणजे, सल्लागार गट लसीचे धोके आणि फायदे यांचे मूल्यांकन करत आहे. कोवॅक्सिनच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सल्लागार गटाची आता 3 नोव्हेंबरला पुन्हा बैठक होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यापूर्वी डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने अशी शक्यता व्यक्त केली होती की जर समूह डेटावर समाधानी असेल तर ते 24 तासांच्या आत लसीसाठी त्यांच्या शिफारसी देईल. WHO चा तांत्रिक सल्लागार समूह भारत बायोटेकची अँटी-कोरोनाव्हायरस लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर यादीत (EUL) समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने 19 एप्रिल रोजी EUL साठी WHO कडे मंजुरीसाठी अर्ज केला होता. कोवॅक्सिन लस कोरोना विरूद्ध 77.8 टक्के प्रभावी असून सर्वात धोकादायक डेल्टा प्रकारांवर 65.2 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. कंपनीने जूनमध्येच तिसऱ्या टप्प्यातील निकालांचे अंतिम मूल्यांकन पूर्ण केले आहे. EUL मध्ये कोवॅक्सिनचा समावेश करण्यावर विचार करण्यासाठी मंगळवारी TAG ची बैठक झाली.

WHO ने सांगितले की या आठवड्याच्या अखेरीस कंपनीकडून अतिरिक्त माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. कोवॅक्सिनचा विचार करण्यासाठी पुढील बैठक 3 नोव्हेंबर रोजी होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपर्यंत देशात कोरोना लसीचे 103 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत