गायीच्या शेणापासून बनवलेलं ‘वेदिक पेंट’ लवकरच बाजारात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधीची माहिती दिली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून वेदिक पेंटची निर्मिती केली जाणार आहे. ग्रामीण अर्थवस्थेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचं साधन मिळावं यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून लवकरच ‘वेदिक पेंट’ बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. वेदिक पेंट हे डिस्टेंपर आणी इमल्शन अशा दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे. हे पेंट पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, अॅन्टी बॅक्टेरिअल, अॅन्टी फंगल आणि वॉशेबल आहे. रंगरंगोटी झाल्यावर केवळ ४ तासांत हे पेंट सुकेल. तसेच, वेदिक पेंटमुळे पशूधन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात अंदाजे ५५ हजार रूपयांची वाढ होऊ शकते.”
डिस्टेंपर और इमल्शन में आने वाला यह पेंट इको फ्रेंडली, नॅान टौक्सिक, एंटी बैक्टीरियल, एंटी फंगल और वॅाशेबल होगा और केवल चार घंटे में सुखेगा। इससे पशुधन रखने वाले किसानों को साल में 55 हजार रूपए की अतिरिक्त आमदनी होगी।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 17, 2020