up govt declares 10 sq km around krishna janmasthal as tirthsthala

मोठी बातमी! कृष्ण जन्मस्थळापासूनचा 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर तीर्थक्षेत्र घोषित

देश

उत्तर प्रदेश : योगी सरकारने शुक्रवारी मथुरा वृंदावनात कृष्णाच्या जन्मस्थळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कृष्ण जन्मस्थळापासूनच्या 10 किलोमीटर पर्यंतच्या परिघाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरामध्येच जन्माष्टमी साजरी केली. जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला योगी आदित्यनाथ कृष्णाच्या जन्मस्थळी पोहोचले आणि त्यांनी भगवान श्री कृष्णाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर तीर्थक्षेत्र घोषित करण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मथुरेत मुख्यमंत्री योगी म्हणाले होते की, पूर्वी कोणतेही आमदार, मुख्यमंत्री येथे उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले नव्हते. जे पूर्वी मंदिरांमध्ये जाण्यास घाबरत होते ते आता म्हणत आहेत की राम माझा आहे, कृष्णही माझा आहे.”

उत्तर प्रदेशमध्ये तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे काम सुरू आहे. अयोध्या, वाराणसी, मथुरा येथे सुविधा पूर्वीपेक्षा चांगल्या होत आहेत. दीड वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर वाराणसीमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरमधील काम सुरू आहे. तेही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर मंदिर आणि त्याचा परिसर आणखी भव्य होईल आणि भक्तांना कोणत्याही अडचणीशिवाय मंदिरात देवतांचे सहज दर्शन घेता येईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत