Modi government's big decision
देश शेती

खुशखबर : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय..

दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इथेनॉलची किंमत 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे हे इथेनॉल उसापासून बनविण्यात बनवण्यात येते. आधी ही किंमत 59.48 रुपये प्रति लीटर होती. तर हेवी इथेनॉलची किंमत 57.61 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. आधी ही किंमत 54.27 रुपये प्रति लीटर होती. याशिवाय 43.75 रुपये प्रति लीटर असलेल्या समुद्री हेवी इथेनॉलची किंमत 45.69 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे साखर कारख्यानांच्या हाती जास्त पैसे येणार आहेत. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्यात येणारा आहे. या इथेनॉलमुळे झिरो प्रदूषण होते. यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसह पर्यावरणासाठी फायद्याचे असणार आहे.

ज्यूटच्या उद्योगाला मदत करण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न धान्याची 100 टक्के पॅकिंग आणि साखरेची 20 टक्के पॅकिंग ही तागाच्या गोण्यांमध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचा फायदा ज्यूट उद्योगामध्ये काम करत असलेल्या चार लाख मजुरांना होणार आहे. तागाचे उत्पादन प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि आंध्र प्रदेशमध्ये घेतले जाते.

तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे बंधारे पुनर्बांधणी आणि सुधारणा योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. देशभरातील 736 बंधाऱ्यांची सुरक्षा आणि वापर नीट करण्यासाठी 10,211 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना एप्रिल 2021 ते मार्च 2031 पर्यंत राबविली जाणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत