Student Was Taking Selfie With Illegal Weapon, Died Due To mistakenly Pressing Trigger
देश

बंदुकीसह सेल्फी घेण्याच्या नादात मोबाईलवर क्लिक करण्याऐवजी चुकून ट्रिगरच दाबला आणि…

राजस्थान : सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोझच्या सेल्फी अपलोड करण्याची क्रेझ कधीकधी जीवघेणी ठरू शकते. अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानच्या धौलपूरमध्ये समोर आली आहे. येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने देशी बंदूक म्हणजेच कट्ट्यासह सेल्फी घेण्याच्या नादात आपला जीव गमावला. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी या तरुणावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह कुटुंबीयांकडून जप्त करण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धौलपूर जिल्ह्यातील उमरेह गावात रामबिलास मीणा यांचा मुलगा सचिन मीना (19) रविवारी सकाळी घराजवळील शेतात बेकायदेशीर देशी बंदूक (कट्टा) घेऊन सेल्फी घेत होता. यादरम्यान त्याच्याकडून मोबाईलवर क्लिक करण्याऐवजी दुसऱ्या हातातील देशी बनावटीच्या बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला. डोक्‍यावर धरलेल्या बंदुकीतून गोळी सुटून त्याच्या डोक्याचा चिंधड्या उडाल्या. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.

त्यानंतर त्याचे कुटुंबीय कायदेशीर कारवाई न करता मृतदेह घरी घेऊन निघाले होते. यादरम्यान पोलिसांना माहिती मिळताच बारी सदर पोलीस ठाण्याने मृतदेह घेऊन जाणारे वाहन वाटेत अडवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. पोलिस स्टेशन प्रभारी योगेंद्र राजावत यांनी सांगितले की, सेल्फी काढण्याच्या प्रक्रियेत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. सध्या तपास सुरू आहे. नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे. बेकायदा शस्त्रास्त्रांबाबतही पोलिस तपास करणार असल्याचे स्टेशन प्रभारी यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत