राजस्थान : सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोझच्या सेल्फी अपलोड करण्याची क्रेझ कधीकधी जीवघेणी ठरू शकते. अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानच्या धौलपूरमध्ये समोर आली आहे. येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने देशी बंदूक म्हणजेच कट्ट्यासह सेल्फी घेण्याच्या नादात आपला जीव गमावला. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी या तरुणावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह कुटुंबीयांकडून जप्त करण्यात आला. […]

