CBSE postpones Class 12 Board exams, cancels Class 10 Board exams

ब्रेकिंग : CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द, 12 वीच्या परीक्षा स्थगित

देश शैक्षणिक

CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर 12 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, त्या पार्शवभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज शिक्षमंत्र्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. त्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता सरकारने सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दहावीचे सर्व विद्यार्थी प्रमोट होतील. बारावीच्या परीक्षा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. १ जून रोजी त्याचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर काय करायचे हे निश्चित केले जाईल. परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना 15 दिवस अगोदर माहिती दिली जाईल. बुधवारी दुपारी पंतप्रधान मोदी आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या तासाभराच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत