देश

धक्कादायक! प्रियकराशी बोलण्यास पतीचा नकार, पत्नीने थेट पतीला कॉफीतून दिले विष…

उत्तर प्रदेश : दोन वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर देखील पहिल्या प्रियकराच्या संपर्कात राहत असल्यामुळे पतीने विरोध केला, आणि या वादातून पत्नीने त्याला कॉफीतून विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 25 मार्च 2025 रोजी रात्री उशिरा घडली. रात्री 10.30 वाजता, कार्यालयातून घरी परतलेल्या अनुजने पत्नीकडे कॉफी मागितली होती. पत्नीने त्याला कॉफीतून विष दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनुज शर्मा (30) आणि पिंकी (28) यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी फारुकनगर, गाझियाबादमध्ये झाला होता. अनुज मेरठमधील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात सतत तणाव होता आणि अनेक वेळा त्यांच्यात मारामारी होणं देखील सामान्य बाब बनली होती. यामुळे पिंकी आपल्या माहेरी राहत होती, आणि पंधरा दिवसांपूर्वीच ती सासरच्या घरी परतली होती.

25 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता अनुज आपल्या कार्यालयातून घरी परतला. घरी पोहोचल्यावर त्याने पत्नीकडे कॉफी मागितली होती. पिंकीने दिलेली कॉफी प्यायल्यानंतर अनुजला अचानक उलट्या होऊ लागल्या. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ खतौली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु, त्याची स्थिती गंभीर असल्याने रुग्णालयाने त्याला मेरठमध्ये रेफर केले.

अनुजच्या मोठ्या बहिणीने मीनाक्षीने सांगितले की, पिंकीचे तिच्या मामाच्या मुलीच्या मुलाशी अफेअर होते, पण घरच्यांच्या दबावाखाली तिने अनुजशी विवाह केला. विवाहानंतर देखील ती आपल्या प्रियकराशी गुपचूप संवाद साधत होती, हे अनुजला समजले आणि यावरून अनुज व पिंकीमध्ये वाद झाले. अनुजने पिंकीचा मोबाईल तपासला आणि त्यात अनेक आक्षेपार्ह संदेश आढळले. यानंतर अनुजने पिंकीला तिच्या प्रियकराशी बोलण्यास मनाई केली होती. या कारणामुळे दोघांमध्ये वाद वाढला आणि पिंकी माहेरी गेली. अनुजने याबाबत पिंकीच्या घरच्यांकडे तक्रार केली, मात्र पिंकीच्या घरच्यांनी तिला काहीच सांगितले नाही. महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर पिंकीने सांगितले की, ती एकत्र राहण्यास तयार आहे. त्यानंतर पिंकी 15 दिवसांपूर्वी सासरच्या घरी परतली, परंतु परत येताच तीने सासूला धमकी दिली की ती काही खास कामासाठी परतली आहे. सासूने विचारले की, काय खास काम आहे? यावर पिंकीने उत्तर दिले की, “ते वेळ आल्यावर कळेल.” यावरून पिंकीच्या वागणुकीविषयी सासू देखील गोंधळात पडली.

अखेर, मंगळवारी रात्री पिंकीने कॉफीमध्ये विष मिसळून अनुजला प्यायला दिले. अनुजवर मेरठमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पिंकीचे कुटुंबीय अनुजला भेटायलाही आले नाहीत. त्याच्या प्रकृतीची विचारणा देखील केली नाही.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पत्नी पिंकीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, 25 मार्च रोजी पत्नीने पतीला विष दिल्याची माहिती मिळाली आहे. पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याची स्थिती सध्या गंभीर आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत