राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, या वक्तव्याशी पंतप्रधान देखील सहमत असतील असं ते म्हणाले.शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली.
सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे, तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील,” असं त्यांनी पत्रात नमूद केलं.
सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याच्याशी आपण सहमत आहोत. २०१९-२० या आर्थिक वर्षात सहकारी बँकांमध्ये गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा करत १०० वर्षे जुन्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देणाऱ्या सहकारी बँकांवर विनाकारण निर्बंध न घालण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
I have written a letter to Hon. @PMOIndia Shri @narendramodi to express my deep concern about the preservation of the ‘Co-operative’ character of Co-operative banks having legacy of more than 100 years. pic.twitter.com/CZ6IBu4kZ1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2020




