सुप्रीम कोर्टाने काल (19 ऑगस्ट) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. महाराष्ट्र सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं. दरम्यान, शरद पवारांनी याविषयी ट्वीट करुन म्हटलं आहे की, “सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा […]
टॅग: sharadpawar
शरद पवारांनी मोदींना पत्र लिहून सहकारी बँकांविषयी व्यक्त केली चिंता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, या वक्तव्याशी पंतप्रधान देखील सहमत असतील असं ते म्हणाले.शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे, तरच या […]
‘सिल्वर ओक’ मधील ५ जणांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईमधील निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ येथील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांचा समावेश आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्व्हर ओकमधील दोन लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना दूर करण्याचं काम करत असतात, त्यातून त्यांना […]
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी शरद पवार यांची प्रतिक्रिया
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही. महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस […]




