Rise in the price of domestic gas cylinders once again

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात, आजपासून 25.50 रुपयांनी स्वस्त

अर्थकारण देश

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 25.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या कपातीनंतर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1811.50 रुपयांवर आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. मे महिन्यात त्याची किंमत 2354 रुपयांवर पोहोचली होती, मात्र त्यानंतर सातत्याने कपात केली जात आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्यामुळे बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1811.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2009 रुपयांपर्यंत खाली आली आहे. कोलकातामध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत पूर्वी 1995.50 रुपयांवरून 1959.00 रुपये आहे. मात्र, 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलै रोजी त्याची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली होती. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांना उपलब्ध आहे. मे महिन्यात त्याची किंमत दोनदा वाढली होती. 7 मे रोजी एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत