In a few minutes you will know how much gas is left in the cylinder with this method

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, कसे कळेल? जाणून घ्या सोपी पद्दत…

देश

पुणे : आजच्या काळात गॅस सिलिंडर ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनली आहे. विशेषत: शहरे आणि गावांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. त्यामुळे अचानक सिलिंडरमधील गॅस संपून तुमची तारांबळ उडू नये, यासाठी काही उपाय करू शकता. त्यानुसार तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आधीच कळू शकते आणि तुम्ही नवीन सिलेंडर बुक करू शकता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस आहे हे जाणून घेण्यासाठी प्रथम एक कपडा पाण्यात भिजवून ओला करा. आता या ओल्या कापडाने सिलेंडरवर जाड रेषा काढा. त्यानंतर काही मिनिटे थांबा. आता तुमच्या सिलेंडरचा जो भाग रिकामा असेल तो लवकर कोरडा होईल आणि जिथे गॅस असेल तो भाग उशिरा सुकेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिलेंडरमधील गॅसच्या प्रमाणाचा सहज अंदाज लावू शकता. वास्तविक, गॅसने भरलेला भाग थंड असतो, तुलनेने सिलेंडरचा रिकामा भाग गरम असतो, त्यामुळे रिकाम्या भागातील पाणी लवकर सुकते.

याव्यतिरिक्त, अनेक वेळा आपण सिलेंडर उचलून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु या पद्धतीत आपल्याला किती गॅस शिल्लक आहे हे कळत नाही. कारण रिकामा सिलिंडरही खूप जड असतो. मात्र, सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे त्याचे योग्य वजन करून निश्चित केले जाऊ शकते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत