entire family committed suicide, A suicide note has been found
देश

धक्कादायक! आईला विचारले- मोहरमच्या दिवशी मरण पावल्यास स्वर्ग मिळेल का? काही वेळाने मुलीने केली आत्महत्या…

मध्य प्रदेश : इंदोरमध्ये 15 वर्षीय मुलीने मोहरमच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आईला प्रश्न विचारला होता की इमाम हुसेन या दिवशी शहीद झाले का? आज जे मरण पावतात ते शहीद होतात का? ते स्वर्गात जातात का? त्यावर आईने उत्तर दिले- होय. काही वेळानंतर मुलीने गळफास घेतला. कुटुंबातील सदस्यांनी तिला खाली उतरवून रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदोर शहरातील रावजी बाजार परिसरातील चंपा बागेत असलेल्या हथीपाला येथे घडली. राबिया आपल्या संपूर्ण कुटुंबासह शुक्रवारी सायंकाळी उशिरा मोहरमचा उपवास सोडण्यासाठी बसली होती. आईने आपल्या मुलीच्या आवडीची खीरही बनवली होती. त्यावेळी तिने विचारलेल्या एका प्रश्नाने तिचा जीव घेतला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी राबियाचा अकरावीत प्रवेश घेण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी तिला अकरावीची पुस्तके देण्यात आली होती. ती खूप आनंदी होती, मग तिने असे पाऊल का उचलले? हे कोणालाही समजले नाही. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी तिच्या शाळेची सहल राऊ सर्कलजवळ नखराली धानी येथे गेली होती. तिथे राबियाच्या मैत्रिणीचा झुल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर राबिया काही भ्रामक गोष्टी बोलू लागली होती. ती नेहमी म्हणायची की जीवन आणि मृत्यू म्हणजे काय? आपण कधीही मरू शकतो. अशा गोष्टींवर कुटुंबीय तिला अनेक वेळा खडसवायचे, पण तिच्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ती मानसिकदृष्ट्या सावरू शकली नव्हती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत