नवी दिल्ली : राज्यसभेत काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचा बंडल सापडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला आहे. याबाबत खुद्द सभापतींनी सभागृहात सांगितले आहे. ही गंभीर बाब असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी अध्यक्ष जगदीप धनखर यांनी माहिती दिली कि, ‘काल (गुरुवारी) सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सीट क्रमांक 222 मधून रोख रक्कम सापडली आहे. ही जागा तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार व्हायला हवा आणि तो केला जात आहे.
अध्यक्षांनी नोटा मिळाल्याचे सांगताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्वकाही स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही (अध्यक्षांनी) त्यांचे (अभिषेक मनू सिंघवी) नाव घ्यायला नको होते.” खरगे यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला. त्यावर खर्गे म्हणाले की, अशी चिखलफेक करून देशाची बदनामी केली जात आहे. तुम्ही (अध्यक्ष) कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव आणि जागा याबद्दल कसे म्हणू शकता? खरगे यांच्या आरोपांवर सभापती म्हणाले की, ती कोणत्या जागेवर मिळाली आणि ती जागा कोणाला दिली गेली हे त्यांनी सांगितले आहे.
भाजपचे प्रमुख आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. हा सभागृहाच्या गरिमेवरचा हल्ला आहे. योग्य तपास होईल, असा मला विश्वास आहे. मला आशा होती की आमचे विरोधी पक्षनेतेही सविस्तर चौकशीची मागणी करतील. विरोधकांनी नेहमी सद्बुद्धी जपली पाहिजे. निरोगी मन आणि निरोगी भावनांसह सर्व तपशील बाहेर आला पाहिजे. याचा दोन्ही पक्षांनी निषेध केला पाहिजे.”
या प्रकरणावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे! मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा 500 रुपयांची नोट सोबत घेऊन जातो. काल दुपारी 12.57 वाजता मी सदनात पोहोचलो आणि 1 वाजता सदन सुरू झाले. मग मी अवधेश प्रसादसोबत दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो आणि मग संसदेतून बाहेर पडलो!
Heard of it first time now. Never heard of it till now! I carry one 500 rs note when I go to RS. First time heard of it. I reached inside house at 12:57 pm and house rose at 1 pm then I sat in canteen till 1:30 pm then I left parl!
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) December 6, 2024




