देश

ब्रेकिंग! जगदीप धनखर यांच्याविरोधात राज्यसभेत काँग्रेस आणणार अविश्वास प्रस्ताव, सपा-टीएमसीचा देखील पाठिंबा

नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील वातावरण थोडे तापलेले आहे. त्यातच आता राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना हटवण्यासाठी विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. अध्यक्ष जगदीप धनखर यांच्या विरोधात विरोधी आघाडी एकत्र आली असून समाजवादी पक्ष (एसपी) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) देखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या काही दिवसांपासून इंडिया ब्लॉकच्या निदर्शनांपासून दूर राहिलेल्या टीएमसी आणि सपा खासदारांनीही अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मंगळवारी राज्यसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. अविश्वास प्रस्ताव तयार असून त्यावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी राज्यसभेत जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात अध्यक्ष जगदीप धनखड यांची भूमिका पाहता काँग्रेस त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत