Supriya Sule
महाराष्ट्र

जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही, लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट

मंगळवारी केंद्र सरकारकडून लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित तीन विधेयकं सादर करण्यात आली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० चाही समावेश होता. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांच्या तरतुदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल तसंच कृषी क्षेत्रातील खासगी गुंतवणूक वाढेल असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यावेळी विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही असं स्पष्ट केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लोकसभेतील आपल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.


सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना सभागृहाला सांगितलं की, “या विधेयकाच्या संदर्भात केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांची संमती घेतली आणि मुख्यमंत्री या प्रारुपास संमत आहेत असा उल्लेख केला आहे. परंतु जेव्हा मी तपासणी केली तेव्हा ही संमती यापुर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली होती. महाराष्ट्र याला सहमत नाही”.

“ज्या बैठकीचा या विधेयकाच्या अनुषंगाने केंद्र सरकार संदर्भ देत आहे त्यामध्ये कृषी मुल्यनिर्धारण आयोगाच्या मुद्यांबाबत चर्चा केली होती का?,” असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी यावेळी विचारला. तसंच ज्या असामान्य परिस्थितीत सरकार हा कायदा लागू करणार आहे त्याचा फॉर्मुला देखील केंद्राने राज्यांना दिलेला नाही असंही त्यांनी ट्विट करत म्हटलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत