मंगळवारी केंद्र सरकारकडून लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित तीन विधेयकं सादर करण्यात आली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० चाही समावेश होता. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांच्या तरतुदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल तसंच कृषी क्षेत्रातील खासगी गुंतवणूक वाढेल असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यावेळी विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही […]

