Suicide of the accused who killed the girl's grandmother and younger brother out of one-sided love

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

नागपूर महाराष्ट्र

नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, गांधीबाग परिसरातला हा तरुण अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीच्या मागे लागला होता. धुर्वे कुटुंबियांनी मुलीची समजूत घातली. तिने त्याच्यासोबत सर्व संपर्क तोडले होते. तरीही तो सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या कृष्णानगर भागात यायचा. त्यामुळे धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला मामाच्या घरी पाठवले होते.

काल दुपारी धुर्वे दाम्पत्य कामावर गेल्यानंतर लक्ष्मीबाई आणि यश दोघेच घरी होते. त्यावेळी तो तरुण आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला. शेजाऱ्यांनी तिथे जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. धुर्वे दाम्पत्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुण फरार झाला. त्यानंतर आरोपीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

काल दुपारी दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी एक्टिव्हाने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने एकाने रेल्वे समोर आत्महत्या केल्याची कंट्रोल रूमला माहिती दिली. रेल्वे कंट्रोल रूम ने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत