Google and Amazon fined 100 million euros
ग्लोबल

गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला १०० दशलक्ष युरो चा दंड, जाणून घ्या कारण

डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो (४.२ कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे. फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं हा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या फ्रेंच वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही. त्या जाहिरातींच्या उद्देशानं आपल्या कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या होत्या, असं CNIL नं सांगितलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुगल आणि अॅमेझॉन याबद्दल कोणतीही माहिती देण्यास असमर्थ ठरले आहेत. दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या वेबसाईट्स मध्ये बदल केले होते. परंतु ते बदल फ्रान्सच्या नियमांप्रमाणे योग्य नव्हते, असंही CNIL नं म्हटलं आहे. गुगलच्या प्रकरणात त्यांनी कुकीजद्वारे एकत्र केलेल्या डेटाटून जाहिरातीद्वारे कमवलेल्या उत्पन्नातून नफा मिळवला. याचा परिणाम तब्बल ५० दशलक्ष युझर्सवरही झाला, असंही कंपनीनं सांगितलं. त्यांना ठोठावण्यात आलेला दंड हा त्यांच्या नियमांच्या उल्लंघनाच्या तुलनेत योग्य आहे, असंदेखील या कंपनीनं म्हटलं आहे.

गुगल आणि अॅमेझॉनला या संस्थेनं तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामध्ये त्यांना आपली पद्धत बदलावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या डेटाचा वापर कसा केला जातो आणि कुकीजना ते कसं नाकारू शकतात हेदेखील त्यांना स्पष्ट करावं लागणार आहे. असं न केल्यास त्यांना दररोज १ लाख युरोचा दंड भरावा लागणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत