ST bus collided with guardrail at Nandgaon-Otav Phata in Sindhudurg
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग : सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला…

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघालेल्या बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या नाहीत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस मालवणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. मध्यरात्री दोनच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नांदगाव-ओटव बॉक्सवेलवरील संरक्षक कठड्याला आदळली. बस संरक्षण कठड्याला धडकताच मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व विद्यार्थी गाढ झोपेत होते. अपघात झाल्यामुळे घाबरून विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. यातील काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या.

चालकाला झोप लागल्यामुळे अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. जखमींना रूग्णवाहिका मागवून कणकवली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत