The central team explained the reasons for the increase in corona infection in the state
कोरोना महाराष्ट्र

केंद्रीय पथकाने सांगितली राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची कारणे, सुचवले ‘हे’ उपाय

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून करून असं का घडलं, याची पाहणी केली. त्यानंतर केंद्रीय पथकाने याला जबाबदार असणाऱ्या कारणांबद्दलचा अहवाल तयार केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यात प्रामुख्याने लोकलमधील गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकल तसेच सार्वजनिक वाहतूक सुरु केली, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. आरोग्य यंत्रणा आता गांभीर्याने काम करत नसल्याचं देखील केंद्रीय पथकाने म्हटलं आहे.

केंद्रीय पथकाने सुचवलेले उपाय :

  1. राज्य सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी.
  2. रुग्णांचा शोध घ्यावा.
  3. कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन केले पाहिजे.
  4. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा.
  5. लसीकरण सुरू ठेवावे.

काल (7 मार्च) महाराष्ट्रात 11,141 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 6013 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 97,983 झाली आहे. राज्यात एकूण 52, 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत