Chief Minister Uddhav Thackeray took the first dose of Corona vaccine
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. मध्ये जाऊन लसी घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. डॉ. तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि रश्मी ठाकरेंच्या आई यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत