schools in the state

धुळे जिल्ह्यातील स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या शाळांचे ऑडिट लवकरच – मंत्री दीपक केसरकर

धुळे महाराष्ट्र

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. ज्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट राहिले आहे, अशा शाळांनी लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून शाळेत अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले आहे. यामध्ये जवळपास 80 टक्के शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या शाळांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही, अशा शाळांनी तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून अग्निरोधक यंत्रणा बसवावेत अशा सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत