Sanjay Raut's suggestive statement that Aurangabad will definitely be Sambhajinagar

औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

औरंगाबाद महाराष्ट्र

मुंबई : औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज (२४ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारलं असता त्यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे सूचक वक्तव्य केले. मात्र त्यामुळे आता महाविकासआघाडीत पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेविरोधात भूमिका मांडली होती. त्यानंतर या विषयावरून महाविकासआघाडीत कुरबुरी सुरु झाल्या होत्या. ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांवर टीकाही करण्यात आली होती.

संजय राऊतांनी मुस्लीम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत आहे, अशी घणाघाती टीका केली होती. परंतु औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत