मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना शुक्रवारी मध्यरात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) अटक करण्यात आली आहे. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. आज सकाळी ११ वाजता दोघांनाही पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे.
शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूरच्या घरी धाड टाकली, त्यानंतर देशमुख यांची दुपारी कसून चौकशी करण्यात आली. संध्याकाळी ईडीच्या कार्यालयात त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री ११ वाजेनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अनिल देशमुखांच्या सहकाऱ्यांच्या अटकेनंतर भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. ते म्हणाले कि, “वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचे सचिन संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. मला खात्री आहे की पुढील काही दिवसांत अनिल देशमुखांनाही अटक होईल.”
#Vaze #Vasooli case #AnilDeshmukh Secrataries Sanjeev Palande & Kundan Shinde arrested by ED today. I am sure Anil Deshmukh will be arrested in next few days @BJP4Maharashtra @BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 25, 2021




