A four-wheeler caught fire at Pune University Chowk
पुणे महाराष्ट्र

पुणे विद्यापीठ चौकात चारचाकी गाडीने घेतला पेट..

गणेश खिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकात एका चारचाकी गाडीला आग लागली. ही गाडी मुंबईहुन पुण्याच्या दिशेने रात्री दहाच्या सुमारास येत होती. गाडीतून वास आल्यामुळे चालकाने गाडी बाजूला घेतली आणि खाली उतरला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठ चौकात चालकास गाडीतून जळाल्याचा वास आला. त्यामुळे त्याने गाडी बाजूला घेऊन पाहणी केली. तेव्हा गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच औंध अग्निशन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत