पुणे : उद्या पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या (२1 जुलै) तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२२ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील पाणीपुरवठा बंद असणारा भाग वडगाव जलकेंद्र परिसर
- हिंगणे
- आनंदनगर
- वडगाव
- धायरी
- आंबेगाव पठार
- दत्तनगर
- धनकवडी
- कात्रज
- भारती विद्यापीठ परिसर
- कोंढवा बुद्रुक इत्यादी.
पाणीपुरवठा बंद सूचना#PMC #nowatersupply #Pune pic.twitter.com/i0918wfWNO
— PMC Care (@PMCPune) July 18, 2022




