Vaccination facility through the health department for bedridden patients
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…

पुणे : केंद्र सरकारने अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाल्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबईत अशाप्रकारे घरोघरी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 9 ऑगस्टपासून पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन महापालिकेतर्फे कोरोनाची लस दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर आजारपणासंदर्भातली डॉक्टरांची कागदपत्र जोडावी लागणार आहेत. या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर महापालिकेकडून अर्जदाराच्या घरी जाऊन कोवॅक्सिनचा डोस दिला जाणार आहे.

घरी लसीकरणासाठी अर्ज कसा करायचा?

  1. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी ईमेलवर ऑनलाईन अर्ज करणाचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
  2. संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळल्याचे कारण, सदरची व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आणि त्याच्या नातेवाईकांचे संमतीपत्र ही कागदपत्र लसीकरणासाठी आवश्यक आहेत.

कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या व्यक्तींना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर तारीख आणि लसीकरणाची वेळ कळवली जाईल. लसीकरण करताना आणि लसीकरण झाल्यानंतर 30 मिनीटे व्यक्तीचे निरीक्षण करण्यासाठी फॅमिली डॉक्टर उपस्थित असणे अपेक्षित आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत