नाशिक महाराष्ट्र

हृदयद्रावक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या

नाशिक :  पतीने आपल्या १९ वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहराच्या एका रहिवासी भागात ही घटना घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून पतीने पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात संपूर्ण सत्य बाहेर आले आणि पतीचे बिंग फुटले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमृताकुमार आणि आरोपी पती विकीरॉय हे सातपूर परिसरात राहत होते. पती बिगारी कामगार आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने आणि महिला गरोदर असल्यामुळे ती आपल्या वडिलांकडून पैसे आणायची. मात्र, या गोष्टीवरून त्यांच्यात कायम वाद व्हायचा. पतीला आपल्या पत्नीच्या वागण्यावर आणि घरी येणाऱ्या जाणाऱ्यांवर शंका आली होती. काही दिवसांपासून त्याच्या मनात संशय निर्माण झाला होता. त्यातूनच आरोपीच्या मनात राग धगधगत होता. २८ फेब्रुवारीआधी एका रात्री ते दोघेच घरात असताना रागाच्या भरात पतीने तिच्यावर हल्ला केला. त्याने पत्नीला गंगापूर रोडलगत असलेल्या शहीद अरुण चित्ते पुलाजवळ नेत तिचा गळा आवळला आणि पत्नीची हत्या केली.

गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून नवऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर आणि ग्रामीण पोलिसांना पाठवले. त्याचे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी तंतोतंत जुळले. मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचं पतीने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत