To bring transparency in the food distribution system with the help of modern technology
महाराष्ट्र

अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाने पारदर्शकता आणणार, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी, असे निर्देश मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले. जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. कदम यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जळगाव जिल्ह्यातील वाहतूकदार यांनी गोदामांमध्ये पोहोच मालाच्या ई-1 रजिस्टरमधील अभिलेख, या अभिलेखाच्या विविध टोल नाक्यावरील असलेल्या नोंदी, जि पि एस यंत्रणे वापर वाहतूकदार नियमाप्रमाणे करत आहेत का? ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषांची पूर्तता करत आहेत का याबाबत संबंधित परिवहन अधिकारी यांचा अहवाल, अन्नधान्य वितरण करण्यात येणाऱ्या वाहनांना नियमाप्रमाणे हिरवा रंग, PDS चे फलक लावण्यात आले आहेत का? जळगाव जिल्ह्यातील धान्यांचे पूर्ण वाटप इ पॉस मशिनद्वारे झाले आहे का आदी बाबींचा डॉ कदम यांनी आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यातील या बाबतीत अहवाल शासनाला तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देश डॉ. कदम यांनी दिले.

राज्यमंत्री डॉ. कदम यांनी जिल्ह्यामधील अन्नधान्य वाहतुकीच्या वाहनांवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे जी.पी.एस. यंत्रणा बसविलेली नसल्यास तसेच माल व्यपगत होण्याची प्रकरणे यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश दिले. पुढील 3 महिन्यांत सर्व संबंधित वाहतुक व्यवस्थेवर जी.पी.एस. यंत्रणा क्षेत्राची नावे तसेच गैरप्रकाराबाबत तपासणी करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत